Sunday 20 February 2022

World Mother Language Day : 21 फेब्रुवारी रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस साजरा केला जातो. जाणून घ्या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व...

 World Mother Language Day : जगभरात 21 फेब्रुवारी रोजी जागतिक मातृभाषा दिवस साजरा केला जातो. जगभरातील भाषा आणि सांस्कृतिक विविधता जोपासणे आणि त्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा उद्देश्य आहे. युनेस्कोने 17 नोव्हेंबर 1999 रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस साजरा करण्याची घोषणा करण्यात आली होती. 

जगात सुमारे ७ हजार भाषा बोलल्या जातात. भारतातही प्रामुख्याने २२ भाषा बोलल्या जातात. भारतात जवळपास 1300 च्या आसपास मातृभाषा आहेत. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या दिवशी जगभरात अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. यानिमित्ताने शिक्षण आणि साहित्याशी निगडित लोक विविध भाषांबद्दल चर्चा करतात. मातृभाषेबद्दल जागरूकता निर्माण करणे, भाषिक विविधता जोपासणे, त्याचे महत्त्वदेखील अधोरेखित केले जाते. जगात काही मातृभाषा लोप पावत असल्याबद्दलही जागतिक पातळीवर चिंता व्यक्त केली जाते. मातृभाषेचे संवर्धन करणे, मातृभाषेचा प्रचार-प्रसार करण्याबाबत धोरण ठरवले जाते. 

21 फेब्रुवारी रोजी का साजरा करतात मातृभाषा दिवस

भारताच्या फाळणीनंतर पाकिस्तानची निर्मिती झाली. पाकिस्तानची निर्मिती झाली तेव्हा पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असे दोन भाग होते. पश्चिम बांगलादेशमध्ये उर्दू आणि पश्चिम बांगलादेशमध्ये बंगाली भाषिकांचे प्रमाण अधिक होते. तत्कालीन पाकिस्तान सरकारने भाषा धोरण लागू करून पाकिस्तानची अधिकृत भाषा म्हणून उर्दूला मान्यता दिली होती. पाकिस्तान सरकारच्या या धोरणाच्या विरोधात ढाका विद्यापीठात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. ढाका विद्यापीठातील आंदोलनावर पोलिसांनी 21 फेब्रुवारी 1952 रोजी गोळीबार केला होता. आंदोलनाच्या परिणामी पाकिस्तान सरकारला नमतं घ्यावं लागले आणि बंगाली भाषेलाही मान्यता दिली. 

SOURCE:https://marathi.abplive.com/news/world/international-mother-language-day-know-about-history-and-importance-1034938

No comments:

Post a Comment

Featured post

12th &10th Class CBSE Exam 2023-24 Toppers of KV Southern Command Pune

Congratulations to 12th &10th Class students on your well-deserved success! You're an inspiration! Toppers of 12th &10th Class...