जागतिक विशेष ग्रंथपाल दिन
Maharashtra Times | Updated: Apr 9, 2014, 09:12PM IST
पुस्तकांच्या विश्वात काम करणारा ग्रंथपाल (लायब्ररियन) हा समाजातील महत्त्वाचा घटक आहे. मात्र, 'वाचाल तर वाचाल' असा संदेश देणारा ग्रंथपाल सरकारच्या विचित्र धोरणांमुळे आज कोर्टाचे उंबरे झिजविताना दिसतो आहे. तर बदलत्या समाजव्यवस्थेत ग्रंथपालाची भूमिकाही झपाट्याने बदलत आहे. करिअरच्या असंख्य संधी या क्षेत्रात उपलब्ध होत असून, ई-ग्रंथपाल ही नवी संकल्पना इंटरनेटमुळे प्रचलित होऊ लागली आहे. मात्र, शाळा तेथे ग्रंथालय आणि ग्रंथपाल ही संकल्पना अजूनही साकार होताना दिसत नाही. एप्रिल महिन्याचा दुसरा गुरूवार हा जागतिक विशेष ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त या क्षेत्रातील समस्या व संधींचा घेतलेला आढावा...
समृद्धीसाठी वाचनाकडे कल
आपल्या शैक्षणिक पद्धतीमध्ये बालकांसाठी पुस्तके हा प्रकार रुळलेला नाही, जसा तो पाश्चात्त्य देशांत दिसतो. माध्यमिक विद्यालयांमध्ये ५०० पटसंख्येपुढील शाळांतच ग्रंथालय व ग्रंथपाल असतो. त्यामुळे ग्रामीण, डोंगरी, आदिवासी विभागातील बहुतांश शाळा ग्रंथालयांविनाच राहतात. जेथे ग्रंथालये असतात, तेथे ग्रंथपाल अर्धवेळ असतात. पूर्णवेळ ग्रंथपाल मोठय़ा शाळांनाच लाभतात. शासन शालेय ग्रंथालयांसाठी काहीही आर्थिक जबाबदारी (वार्षिक अनुदान वगैरे स्वरूपात) घेत नाही. त्यामुळे शालेय ग्रंथालये ही अर्धांगवात झाल्याप्रमाणे निस्तेज झालेली आहेत.
Source:http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/librarian/articleshow/33515128.cms
No comments:
Post a Comment