Saturday, 10 April 2021

महात्मा जोतिबा फुले जयंती ११ एप्रिल

महात्मा जोतिबा फुले जयंती

थोर समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले  म्हणजे परीवर्तानाची धगधगती मशाल. महात्मा फुले यांचे विचार आणि कृती आजही अनेकांना प्रेरणा देते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी केलेले काम हे इतिहासांच्या पानावर नेहमीच अतुलनीय ठरले आहे. त्यांनी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यासोबतच त्यांनी लिहिलेले ग्रंथ आणि त्यातील विचार आजही प्रेरणादाई आहेत. 'शेतकऱ्याचा आसूड' आणि 'गुलामगिरी' या ग्रंथामुळे समाजपरीर्तनास मोठी चालना मिळाली.


 11 एप्रिल या दिवशी ज्योतिबा फुले यांची जयंती . ज्योतिबांच्या जयंतीनिमित्त आज पुन्हा एकदा त्यांचे हे विचार अनेकांना विचार करण्यास प्रवृत्त करतील.


महात्मा जोतीराव गोविंदराव फुले (जन्म : ११ एप्रिल १८२७; मृत्यू : २८ नोव्हेंबर १८९०), 
इतर नावे: महात्मा फुलेज्योतिबा फुले, हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते

फुलेंचा संपूर्ण जीवनक्रम 

अ.क्र.दिनांक / महिनाइ.स.घटना
१.एप्रिल ११इ.स.१८२७जन्म (कटगुण, सातारा)
२.इ.स. १८३४ ते १८३८पंतोजींच्या शाळेत मराठी शिक्षण.
३.इ.स. १८४०नायगावच्या च्या खंडोबा नेवसे पाटील यांच्या सात वर्षाच्या सावित्रीबाई नावाच्या कन्येशी विवाह.
४.इ.स. १८४१ ते १८४७मिशनरी शाळेत माध्यमिक (इंग्रजी) शिक्षण.
५.इ.स. १८४७लहुजी वस्ताद साळवे दांडपट्टा तालीम व इतर शारीरिक शिक्षण आणि क्रांतिकारक विचार.
६.इ.स. १८४७टॉमस पेन कृत “राईट ऑफ मॅन” या ग्रंथाचे मनन.
इ.स. १८४८उच्चवर्णीय मित्राच्या लग्नाच्या मिरवणुकीत झालेला अपमान .
८.इ.स.१८४८शूद्रातिशूद्रांसाठी मुलींची शाळा.
इ.स. १८४९शिक्षणदानाचे व्रत घेतल्याने पत्‍नी सावित्रीबाई फुले यांच्यासह करावा लागलेला गृहत्याग.
१०इ.स. १८४९मराठी प्रकाशनांना अनुदान देण्याची मागणी करणार्‍या सुधारकांच्या सभेला दिलेले संरक्षण.
११इ.स. १८५१चिपळूणकरांच्या वाड्यातील व रास्ता पेठेतील मुलींच्या शाळांची स्थापना.
१२नोव्हेंबर १६इ.स.१८५२मेजर कॅंडी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण कार्याबद्दल सरकारी विद्याखात्याकडून सत्कार.
१३इ.स. १८४७थॉमस पेन यांच्या 'राईट ऑफ मॅन' या ग्रंथाचा अभ्यास.
१४इ.स. १८४८मित्राच्या विवाहप्रसंगी निघालेल्या मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला.
१५इ.स.१८४८भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले.
१६सप्टेंबर ७इ.स.१८५१भिडे वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात.
१७इ.स.१८५२पूना लायब्ररीची स्थापना.
१८मार्च १५इ.स.१८५२वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.
१९नोव्हेंबर १६इ.स.१८५२मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार.
२०इ.स.१८५३'दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग ॲन्ड अदर्स' स्थापन केली.
२१इ.स.१८५४स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी.
२२इ.स.१८५५रात्रशाळेची सुरुवात केली.
२३इ.स.१८५६जोतिबांवर मारेकरी घालून हत्येचा प्रयत्‍न झाला.
२४इ.स.१८५८शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.
२५इ.स.१८६०विधवाविवाहास साहाय्य केले.
२६इ.स.१८६३बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली.
२७इ.स.१८६५विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.
२८इ.स.१८६४गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला.
२९इ.स.१८६८दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.
३०इ. स. १९६९छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा लेखन
३१जूनइ. स. १९६९'शिक्षण विभागाचे ब्राह्मण पंतोजी' रचना
३२इ. स. १९६९'ब्राह्मणाचे कसब' या पुस्तकाचे लेखन
३३१३ ऑगस्टइ. स. १९६९भगवान परशुराम याला नोटीस
३४इ. स. १८७३' गुलामगिरी'
३५२४ सप्टेंबरइ.स.१८७३सत्यशोधक समाजची स्थापना केली.
३६इ.स.१८७५शेतकर्‍यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर).
३७इ.स. १८७५स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले.
३८इ.स. १८७६ ते १८८२पुणे नगर पालिकेचे सदस्य होते.
३९इ.स. १८८०दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला.
४०इ.स.१८८०नारायण मेघाजी लोखंडे यांना 'मिलहॅण्ड असोसिएशन' या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.
४१इ.स.१८८२'विल्यम हंटर शिक्षण आयोगा' समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली.
४२इ.स.१८८७सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व नवीन पूजाविधीची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली.
४३इ.स.१८८८ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार.
४४११ मे इ.स.१८८८मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर विठ्ठलराव वंडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्मा' ही पदवी प्रदान केली.
४५नोव्हेंबर २८इ.स.१८९०पुणे येथे निधन.

लेखन साहित्य

जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्याना मुंबईतील सेभेत १८८८ मध्ये ‘महात्मा’ ही उपाधी दिली. त्यामुळे ज्योतिबा फुले हे महात्मा फुले या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली, त्यांपैकी काही ही :-

लेखनकाळसाहित्य प्रकारनाव
इ.स.१८५५नाटकतृतीय रत्‍न
जून, इ.स. १८६९पोवाडाछत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा
जून इ.स. १८६९पोवाडाविद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी
इ.स.१८६९पुस्तकब्राह्मणांचे कसब
इ.स.१८७३पुस्तकगुलामगिरी
सप्टेंबर २४ , इ.स. १८७६अहवालसत्यशोधक समाजाची तिसर्‍या वार्षिक समारंभाची हकीकत
मार्च २० इ.स. १८७७अहवालपुणे सत्यशोधक समाजाचा रिपोर्ट
एप्रिल १२ , इ.स. १८८९निबंधपुणे सत्यशोधक समाजाचा निबंध व वक्तृत्व समारंभ
२४ मे इ.स. १८७७पत्रकदुष्काळविषयक पत्रक
१९ ऑक्टोबर इ.स. १८८२निवेदनहंटर शिक्षण आयोगापुढे सादर केलेले निवेदन
१८ जुलै इ.स. १८८३पुस्तकशेतकऱ्याचा असूड
४ डिसेंबर इ.स. १८८४निबंधमहात्मा फुले यांचे मलबारींच्या दोन टिपणांविषयीचे मत
११ जून इ.स. १८८५पत्रमराठी ग्रंथागार सभेस पत्र
१३ जून इ.स. १८८५पुस्तकसत्सार अंक १
ऑक्टोंबर इ.स. १८८५पुस्तकसत्सार अंक २
१ ऑक्टोंबर इ.स. १८८५पुस्तकइशारा
२९ मार्च इ.स.१८८६जाहीर प्रकटनग्रामजोश्यांसंबंधी जाहीर खबर
२ जून इ.स. १८८६पत्रमामा परमानंद यांस पत्र
जून इ.स. १८८७पुस्तकसत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टकासह सर्व पूजा-विधी
इ.स. १८८७काव्यरचनाअखंडादी काव्य रचना
१० जुलै इ.स. १८८७मृत्युपत्रमहात्मा फुले यांचे उईलपत्र
इ.स. १८९१ (प्रकाशन)पुस्तकसार्वजनिक सत्यधर्म पुस्तक

महात्मा फुले यांच्यावर लिहिलेली पुस्तके

  • असूड (मराठी नाटक) लेखक : डॉ. सोमनाथ मुटकुळे
  • क्रांतिजागर : महात्मा फुले यांची समग्र कविता (डॉ. रवींद्र ठाकूर)
  • क्रांतिबा फुले (नाटक) अनुवादक : फ.मुं. शिंदे. (मूळ आचार्य रतनलाल सोनग्रा साहित्य अकादमीचे प्रकाशन)
  • गोष्टीरूप महात्मा फुले (बालसाहित्य, लेखक - शंकर कऱ्हाडे)
  • पहिली भारतीय शिक्षिका- सावित्रीबाई फुले (चरित्र) लेखक : बा.ग. पवार
  • भारतीय समाजक्रांतीचे जनक महात्मा जोतीराव फुले (ना.ग. पवार)
  • महात्मा (मराठीत आणि इंग्रजीत, डॉ. रवींद्र ठाकूर)
  • महात्मा ज्योतिबा फुले (चरित्र) लेखक : ग.द. माळी
  • महात्मा जोतिबा फुले (चरित्र) लेखिका : गिरिजा कीर
  • महात्मा जोतिबा फुले (चरित्र) लेखक : गोविंद तळवलकर
  • महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले (चरित्र) लेखिका : अनुराधा गद्रे
  • महात्मा ज्योतिबा फुले यांचा सार्वजनिक सत्यधर्म (संपादित) प्रकाशक : श्री गजानन बुक डेपो
  • महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांचे कार्य. लेखक : विठ्ठलराव भागवत
  • महात्मा जोतीबा फुले (चरित्र) लेखक : सुखदेव होळीकर
  • महात्मा जोतीबा फुले (संपादित) प्रकाशक : सूर्या अध्यापन साहित्य
  • महात्मा जोतीबा फुले यांचे १०१ मौलिक विचार. संपादन : नागनाथ कोतापल्ले
  • महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : धनंजय कीर
  • महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : नागेश सुरवसे
  • महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : निर्मळ गुरुजी
  • महात्मा ज्योतीराव फुले (चरित्र) लेखक : पंढरीनाथ सिताराम पाटील
  • महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : भास्कर लक्ष्मण भोळे
  • महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : रमेश मुधोळकर
  • महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : वसंत शांताराम देसाई
  • महात्मा जोतीराव फुले - जीवन आणि कार्य. लेखक : दिलीप मढीकर
  • महात्मा जोतीराव फुले यांचे शेतीविषयक विचार. संपादन : नूतन विभूते ; मनोविकास प्रकाशन
  • महात्मा जोतीराव फुले - वारसा आणि वसा. लेखक : भास्कर लक्ष्मण भोळे
  • महात्मा जोतीराव फुले सार्वजनिक सत्यधर्म (विश्वनाथ शिंदे)
  • महात्मा फुले आणि शेतकरी चळवळ (संपादित) प्रकाशक : सुगावा प्रकाशन
  • महात्मा फुले आणि सत्यशोधक चळवळ. लेखक : मा.प. बागडे
  • महात्मा फुलेंची जीवनक्रांती. लेखिका : लीला घोडके
  • महात्मा फुले जीवन आणि कार्य (संपादित). प्रकाशक : भारतीय विचार साधना प्रकाशन पुणे
  • महात्मा फुले टीका आणि टीकाकार. लेखक : नीलकंठ बोराडे
  • महात्मा फुले दुर्मिळ वाङ्‌मय आणि समकालीन चरित्रे. लेखक : मा.गो. माळी
  • महात्मा फुले यांचा शोध व बोध. लेखक : रा.ना. चव्हाण
  • महात्मा फुले यांची कविता-एक विचार मंथन (शशिशेखर शिंदे)
  • महात्मा फुले यांचे निवडक विचार (संपादित) प्रकाशक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान
  • महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य. लेखक : तानाजी ठोेंबरे
  • महात्मा फुले यांच्या अप्रकाशित आठवणी (संपादित) प्रकाशक : श्री गजानन बुक डेपो
  • महात्मा फुले यांच्या कार्यात ब्राह्मणांचा सहभाग. लेखक : विद्याकर वासुदेव भिडे
  • महात्मा फुले राजर्षी शाहू आणि वैचारिक प्रवास. लेखक : हरिभाऊ पगारे
  • महात्मा फुले व सांस्कृतिक संघर्ष. लेखक : भारत पाटणकर
  • महात्मा फुले व्यक्तित्व आणि विचार. लेखक : गं.बा. सरदार
  • महात्मा फुले समग्र वाङ्मय - संपादक धनंजय कीर. प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती आणि मंडळ
  • महात्मा फुले सामाजिक क्रांतीचे अग्रदूत. लेखक : दत्ता जी. कुलकर्णी
  • युगपुरुष महात्मा जोतीराव फुले. लेखक : बा.ग. पवार
  • युगार्त (जोतिबा व सावित्रीबाई फुले यांच्यावरील चरित्रात्मक कादंबरी, लेखक - बाळ लक्ष्मण भारस्कर)

Sources :- 
1. https://mr.wikipedia.org/wiki/

2.https://marathi.latestly.com/lifestyle/festivals-events/jyotiba-phule-jayanti-2021-quotes-messages-marathi-wishes-whatsapp-status-to-share-on-facebook-twitter-with-family-friends-on-birth-anniversary-of-mahatma-jyotirao-phule-239935.html

No comments:

Post a Comment

Featured post

PARTICIPATE IN THE QUIZ ON THE CONSTITUTION ORGANISED BY THE MINISTRY OF EDUCATION, GOVERNMENT OF INDIA

  PARTICIPATE IN THE QUIZ ON THE CONSTITUTION ORGANISED BY THE MINISTRY OF EDUCATION, GOVERNMENT OF INDIA For Students of Class VI-XII For E...