.. भारतीय संविधानाचे शिल्पकार तथा भारतातील सर्वात ज्येष्ठ वकील, भारतरत्न. डॉक्टर .बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे राष्ट्रपतीच्या हस्ते अनावरण संपन्न...!
------------------------------------------राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते -भारतातील सर्वात ज्येष्ठ वकील, भारतरत्न. डॉक्टर .बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे अनावरण
26 नोव्हेंबर 2024 रोजी संविधान दिनानिमित्त, सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्यासह भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण संपन्न.
स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणा घटनाकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. देशातील कोणत्याच न्यायालयाच्या प्रांगणात आंबेडकर यांचा पुतळा नाही. मात्र, आता थेट सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणात पुतळा विराजमान आहे. 7 फूट उंचीच्या या पुतळ्यामध्ये डॉ. आंबेडकर यांनी वकिल पोशाख आणि हातात संविधानाची प्रत धारण केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात समोरच्या हिरवळीवर आणि बागेत डॉ. आंबेडकरांचा पुतळा बसवला. हा पुतळा ७ फूट उंचीचा असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वकिली पोशाखातील ही छबी असून त्यांच्या हातात हातात संविधानाची प्रत आहे.